सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत देशात कोरोनाने 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 85 ते 95 हजार नवीन लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 50 लाख पार झाला आहे.
आतापर्यंत 50 लाख 20 हजार 360 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 90 हजाप 123 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवार 1290 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 82 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून मुक्त आणि कोरोनावर यशस्वीपणे मात करणार्यांची संख्या 39 लाख आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 39 लाख 42 हजारहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे. मंगळवारी 82 हजार 844 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांत रिकव्हरी रेट 0.45 टक्के वाढला असून एकूण 78.45 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सध्या देशात 9 लाख 95 हजार 933 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 3 महिन्यांतील आकडेवारी पाहिल्यास जगातील सर्वाधिक 21.8% रुग्ण फक्त भारतातच आढळले. 15 जून रोजी देशात कोरोना रूग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 70 होती, ती 15 सप्टेंबरपर्यंत 50 लाख 18 हजारांहून अधिक झाली आहे.